मराठी उखाणे | विनोदी उखाणे: खास लग्नसोहळ्यासाठी मजेशीर आणि सुंदर मराठी उखाणे | Vinodi Ukhane
तुम्ही मराठी विनोदी उखाणे शोधत आहात का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात! इथे तुम्हाला लग्नसोहळे, हळदी समारंभ, किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगासाठी मजेशीर आणि गमतीदार उखाणे मिळतील. उखाणे घेण्याची ही महाराष्ट्रातील एक आकर्षक परंपरा आहे, जी प्रत्येक समारंभात हास्य आणि आनंदाचा रंग भरते.
विनोदी उखाणे ही मराठी परंपरेतील एक खास आणि हसवणारी रीत आहे, जिच्या माध्यमातून विविध प्रसंगांमध्ये हास्याची लहर आणली जाते. लग्नसोहळे, हळदी-कुंकू समारंभ किंवा इतर कोणतेही खास प्रसंग असोत, या गमतीदार उखाण्यांनी संपूर्ण वातावरण आनंदी बनते. उखाणे घेताना मजा आणि मनोरंजन भरपूर होते, आणि यामुळे उपस्थितांचे हसू थांबत नाही.
या पृष्ठावर तुम्हाला मराठी विनोदी उखाण्यांचा संग्रह मिळेल, ज्यामुळे तुमच्या खास क्षणांना हास्याचा तडका मिळेल. जिथे नवरा-नवरी एकमेकांची नावं मजेशीर आणि रंजक पद्धतीने घेतात, तिथे हास्याची फुलं नक्कीच फुलतील!
येथे तुम्हाला सोपे, मजेदार आणि मनमोहक उखाणे सापडतील, ज्यामुळे तुमचा विवाहसोहळा आणखीनच आनंददायक होईल. विविध प्रसंगांसाठी योग्य उखाण्यांची निवड करून तुम्ही तुमच्या खास क्षणांना एक नवा अर्थ देऊ शकता.
हास्याचे क्षण संगठीत करणे, आनंदाच्या नात्यात रंग भरणे.
या विनोदी उखाण्यांनी आपल्या समारंभात हास्य आणि उत्साहाचे गोड क्षण आणावेत, अशी आमची आशा आहे. चला, या खास दिवशी एकत्र येऊया आणि गमती-जमतींसह हसू आणि आनंद साजरा करूया!
गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव, _____राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव.
हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, _____रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.
बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड, _____ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड.
बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी, _____शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, _____ची पप्पी घ्यायला, मी कशाला लाजू.
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, _____भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.
रेशमाच्या शर्ट ला, सोन्याच बटन, _____रावांना आवडत, बकऱ्याच मटण.
ताज्या ताज्या संत्र्याचा, गोड गोड ज्यूस, _____राव आहेत, एक नंबर कंजूस.
स्त्री शिवाय घराला, नाही कशाचा अर्थ, _____रावांचे कष्ट मी, जाऊ देणार नाही व्यर्थ.
रंग हे नवे, गंध हे नवे, _____ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.
शब्दही न बोलता, साद घातली कुणी, _____राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.
समोर येताच तुमचा चेहरा, बघून काळजाचा चुकतो ठोका, _____रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा, भेटला आज मोका.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात _____ आणि _____ची जोडी आहे जबरदस्त.
बेसुरी मी, तू सूर माझा, _____तू आहेस, माझ्या दिलाचा राजा.
७ ला म्हणतात, इंग्रजीमध्ये सेवन, _____ रावांसाठी शिकेन, मी सर्व जेवण.
आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया, ________ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.
हँग ओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू , _____एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.
उन्हाळ्यात अंगाला, घाम येतो फार, आंघोळ कर_____,नाहीतर लोकं होतील पसार.
डास चावला की, येते अंगाला खाज, _____चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज.
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, _____माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.
नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चल _____ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.
0 टिप्पण्या