मराठी उखाणे | नवऱ्याचे उखाणे : खास लग्नसोहळ्यासाठी मजेशीर आणि सुंदर मराठी उखाणे | Navryache Ukhane
तुम्ही मराठी नवऱ्याचे उखाणे शोधत आहात का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात! इथे तुम्हाला लग्नसोहळे, हळदी समारंभ, किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी नवऱ्यांसाठी विविध प्रकारचे उखाणे मिळतील. महाराष्ट्रातील ही खास परंपरा प्रत्येक क्षणाला हास्य आणि आनंदाने भरून टाकते, जी नववधू-वरांचे नाते आणखी दृढ करते.
नवऱ्याचे उखाणे हे मराठी संस्कृतीतील एक मनोरंजक आणि गोड रिवाज आहे, ज्यात वर आपल्या नववधूचे नाव एक वेगळ्या शैलीत घेतो. या परंपरेत हास्य आणि आनंदाचा संगम असतो, ज्यामुळे उपस्थितांची उत्सुकता आणि आनंद वाढतो.
या पृष्ठावर तुम्हाला विनोदी, गोड आणि हळव्या उखाण्यांचा संग्रह मिळेल, जे तुम्हाला तुमच्या खास प्रसंगात चार चाँद लावतील आणि उपस्थितांचा आनंद द्विगुणीत करतील.
येथे तुम्हाला सोपे, मजेदार आणि मनमोहक उखाणे सापडतील, ज्यामुळे तुमचा विवाहसोहळा आणखीनच आनंददायक होईल. विविध प्रसंगांसाठी योग्य उखाण्यांची निवड करून तुम्ही तुमच्या खास क्षणांना एक नवा अर्थ देऊ शकता.
प्रेमाचा संगम आणि आनंदाचा सोहळा, उखाण्यांनी रंगतदार करा.
आम्हाला आशा आहे की या उखाण्यांनी तुमच्या लग्नसोहळ्याला प्रेम आणि हास्याची एक नवीन रंगत मिळेल. चला, या खास दिवसाचे सोनेरी क्षण उखाण्यांमधून साजरे करूया!
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, _____चे बरोबर बांधली जीवन गाठ
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, _____च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, _____झाली आज माझी गृहमंत्री
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, _____चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, _____माझी सर्वांपेक्षा सुंदर
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, _____चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, _____च्या साथीने आदर्श संसार करीन
काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, _____सोबत जीवनात मला आहे आनंद
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, _____चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला_____प्रेमपुतळी
काही शब्द येतात ओठातून, _____चं नाव येतं मात्र हृदयातून
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी_____नाजुक जसे गुलाबाचे फुल
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी _____व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, _____चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, _____च्या सहवासात झालो मी धुंद
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार_____च्या गळ्यात
प्रसन्न वदनाने आले रविराज, _____ने चढविला संसाराला स्नेहाचा साज
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात प्रथम दर्शनीच भरली_____माझ्या मनात
रुप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर _____माझी प्यारी
हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, _____झाली आता माझी सहचारिणी
माझ्याशी लग्न करायला झाली ही राजी मी तिचा राजा ती माझी राणी माझ्या _____नाव घेतो हळदीच्या दिवशी..!
एक होती चिऊ, एक होता काऊ _____चे नाव घेतो डोक नका खाऊ!
_____ला पाहताच जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा!
चंद्राचा होतो उदय, समुद्राला येते भरती _____ला बघून माझे सारे भान हरती!
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री थोर भाग्य माझे की मला _____सारखी भेटली गृहमंत्री!
घरच्यांना झाली होती लग्नाची खूप घाई आई बाबांच्या हट्टामुळे, आणि _____च्या प्रेमामुळे झालो मी या घरचा जवाई.!
कृष्णाला बघून राधा हसली आता मला माझी राणी भेटली मंगळसूत्र घालून _____माझी सौभाग्यवती केली!
_____बघून सगळे म्हंटले की हीच आपल्या घरची सून मी तिला बघताच केला तिने माझा खून.
आई, बाबा यांना झाली होती माझ्या लग्नाची घाई _____ नाव घेतो आता तरी घरात येऊ देना ताई!
कृष्णाचे नाव सदैव माझ्या मुखी _____ ला ठेवीन आयुष्यभर सुखी..!
सोन्याची सायकल चांदीच शीट चल ग _____ डबलशीट!
गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी _____ ला घेऊन जातो मी आता तिच्या सासरी!
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो _____ला जलेबी चा घास!
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस _____ तू फक्त कायम गोड हास!
0 टिप्पण्या